महाराष्ट्र

बँकेच्या कारभारावर नाराज तरुणाने पसरवली बॉम्बची अफवा

बँकेच्या कारभारावर नाराज तरुणाने पसरवली बॉम्बची अफवा
बँकेच्या कारभारावर नाराज तरुणाने पसरवली बॉम्बची अफवा फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर : उल्हासनगर येथील एका बँकेत बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या तरुणाला काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत हा तरुण बी.कॉमचा विद्यार्थी असल्याचे समोर आले असून बँकेच्या कारभारावर नाराज असल्याने त्याने ही अफवा पसरवली असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे दहाच्या सुमारास एका तरुणाने उल्हासनगर नियंत्रण कक्षाला फोन करून नेहरू चौकात असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण बँकेची झडती घेतली, मात्र बॉम्ब सापडला नाही. मोबाईल लोकेशननुसार बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या वालधुनी, शिवाजीनगर येथील २३ वर्षीय तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले की, खोटी अफवा पसरवणारा तरुण हा बी.कॉमचा विद्यार्थी असून तो के.वाय.सी करण्यासाठी बँकेत गेला होता, मात्र बँक कर्मचाऱ्यांच्या कामावर तो नाराज होता, त्यामुळे त्याने असे केले असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475