जिल्हा

अंबरनाथ होणार होर्डिंगमुक्त

अंबरनाथ होणार होर्डिंगमुक्त
अंबरनाथ होणार होर्डिंगमुक्त फोटो: ठाणे वैभव
नगरपरिषदेची अनधिकृत होर्डिंगविरोधी धडक कारवाई अंबरनाथ : अखेर अंबरनाथमध्ये अनधिकृत होर्डींग्ज हटवण्याची कार्यवाही नगरपालिकेने हाती घेतली आहे. आज भर पावसात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंगविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्द्यावरून चर्चाना उधाण आले होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी याविषयावरून प्रशासनाला लक्ष केले होते. मागील आठवड्यात होर्डिंग लावताना विजेच्या धक्क्याने एक तरुण मरण पावल्याची घटना देखील शहरात घडली होती. अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर आज नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार उपमुख्याधिकारी उमेश राऊत, मिळकत व्यवस्थापक सचिन गायकवाड, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संख्ये आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे आज अंबरनाथ पश्चिम येथील साईबाबा मंदिर परिसरापासून बदलापूर मार्गापर्यंत अनधिकृत होर्डिंग, बॅनर व जाहिरात फलक हटविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शहराच्या सौंदर्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने अशा अनधिकृत जाहिरातींविरुद्ध नगरपरिषदेची कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे., कोणतेही होर्डिंग, बॅनर किंवा जाहिरात फलक उभारण्यापूर्वी नगरपरिषदेची आवश्यक परवानगी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475