जिल्हा

दीप राम्भीया व प्रतिक रानडे यांना ऑल इंडिया बॅडमिंटनचे ब्राँझ पदक

दीप राम्भीया व प्रतिक रानडे यांना ऑल इंडिया बॅडमिंटनचे ब्राँझ पदक
दीप राम्भीया व प्रतिक रानडे यांना ऑल इंडिया बॅडमिंटनचे ब्राँझ पदक फोटो: ठाणे वैभव
गर्वित मेहंदीऱत्ताचे धुळे जिल्ह्यात अजिंक्यपद ठाणे : ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने आपल्या खेळाडूंच्या भक्कम कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा राष्ट्रीय व जिल्हा पातळीवर भक्कम उपस्थिती नोंदवली आहे. पुणे येथे पार पडलेल्या वि. वि. नातू स्मृती अखिल भारतीय सिनियर रँकिंग बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत, ठाण्याचे तडाखेबाज दुहेरी खेळाडू दीप राम्भीया आणि प्रतिक रानडे यांनी पुन्हा एकदा देशपातळीवर प्रभाव टाकत ब्राँझ पदक जिंकले. या स्पर्धेतील त्यांच्या खेळात सामंजस्य, संयम आणि अनुभवाचे विलक्षण मिश्रण पाहायला मिळाले. त्यांनी पहिल्या सामन्यात आदित्य दिवाकर आणि केविन थंगम यांच्यावर २१-१६, २१-२३, २१-२३ असा रंजक विजय मिळवला. पुढील सामन्यात हरि भारती बी. आणि भरत संजय एस. या जोडीशी चुरशीची झुंज झाली, जिथे त्यांनी पहिला सेट ८-२१ असा गमावून दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करत २२-२० असा जिंकला, मात्र तिसऱ्या सेटमध्ये १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह त्यांनी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून ब्राँझ पदक पटकावले, आणि सलग दुसऱ्यांदा अखिल भारतीय स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळवले. दुसऱ्या बाजूला, गर्वित मेहंदीऱत्ता या युवा खेळाडूने आपली तयारी आणि समर्पण सिद्ध करत धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील गटातील एकेरी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. विशेष बाब म्हणजे गर्वितने २०२४ मध्ये केवळ बॅडमिंटनच्या भवितव्यासाठी धुळे सोडून ठाण्यात येण्याचा ठाम निर्णय घेतला होता. ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या कठोर प्रशिक्षणात तो झपाट्याने विकसित होत असून त्याच्या खेळात सुसूत्रता, मानसिक ताकद आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखण्याची खास शैली दिसून येते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475