जिल्हा

बारवर छापा पडण्याआधीच अलार्म आणि गुप्त पळवाट

बारवर छापा पडण्याआधीच अलार्म आणि गुप्त पळवाट
बारवर छापा पडण्याआधीच अलार्म आणि गुप्त पळवाट फोटो: ठाणे वैभव
ठाणे : पोलीस छापा टाकायला गेले, पण आत पोहोचताच उघड झालं एक मोठं रॅकेट. अलार्मचा इशारा, गुप्त खोली, पळवाट आणि बारबालांचं भयाण वास्तव… मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड परिसरातील ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या सर्व गोष्टी उजेडात आल्या. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारवर सोमवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या बारमध्ये पोलिसांच्या येण्याची वर्दी देण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ ‘अलार्म बटन’ बसवलेलं होतं. पोलीस आले की कर्मचारी तो बटन दाबायचे, आणि लगेचच बारमध्ये दिवे लागायचे. ही एक सिग्नल पद्धत होती, त्यानंतर बारबाला लगेचच मागे पळायच्या. या छाप्यात पोलिसांना मेकअप रूमच्या मागे एक गुप्त दरवाजा सापडला. चावीच्या सहाय्याने हा दरवाजा उघडल्यावर मागे एक अरुंद बोळ, आणि त्याच्याशी जोडलेली गुप्त खोली सापडली. याच ठिकाणी 11 बारबाला लपलेल्या अवस्थेत आढळल्या. मीरा-भाईदरमध्ये 30 ते 35 बार आहेत. या बारना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. पण बार चालू असतात चार वाजेपर्यंत. या सर्व बारमध्ये प्रत्यक्षात गाणं म्हटलं जात नाही. बारबालांना ‘सिंगर’ म्हणून दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात वाजणारं गाणं असतं रेकॉर्डेड, आणि त्या फक्त ओठ हलवत असतात. रात्रीच्या सुमारास महिला आणि पुरुष मिळून फक्त 8 सिंगर ठेवण्याची परवानगी असते. मात्र या ठिकाणी 20 ते 25 बारबाला असतात.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475