जिल्हा

ऐरोली, विटावा, कळवेकर वाहतूक कोंडीत अडकले

ऐरोली, विटावा, कळवेकर वाहतूक कोंडीत अडकले
ऐरोली, विटावा, कळवेकर वाहतूक कोंडीत अडकले फोटो: ठाणे वैभव
कंटेनर दुभाजकावर चढला ठाणे: नवी मुंबई पालिका हद्दीत आज सकाळी एक मोठा कंटेनर थेट दुभाजकावर चढला. त्यामुळे या परिसरात अभुतपूर्व वाहतुक कोंडी झाली होती. तर ऐरोली, विटावा, कळवेकर कोंडीत अडकले. विटावा, कळवा, साकेत रोडपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे नवी मुंबईत निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नवी मुंबई एमआयडीसीच्या हद्दीत एक मोठा कंटेनर दुभाजकावर चढल्याने कळवा-जुना बेलापूर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कळवा, साकेत ब्रिज, जेलरोडपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे आणि नवी मुंबई विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सकाळी ८ वाजल्यापासून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते. वाहतुक कोंडीचा परिणाम नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनाही सहन करावा लागला. चार विद्यार्थी कळवा परिसरात अडकले कोंडीचे लोण ठाणे शहरापर्यंत पोहचल्याने बारावीच्या परिक्षेसाठी निघालेले चार विद्यार्थी कळवा परिसरात अडकले होते. वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर विद्यार्थ्याचे कॉल्स येताच, कळवा वाहतुक निरिक्षक संजय जाधव यांच्या निर्देशानुसार त्या विद्यार्थ्याच्या रेस्क्युसाठी तत्परतेने धाव घेत रायडर्स यांनी चारही विद्यार्थ्याना ठाणे, सिडको परिसरातील बेडेकर कॉलेजमध्ये वेळेत पोहचवले. वाहतूक शाखेच्या पोलीस रायडर्समुळे परिक्षार्थीचे नुकसान टळले. बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला विविध १८ वाहतुक युनिटमध्ये ५४ रायडर्स सज्ज ठेवले आहेत, अशी माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475