महाराष्ट्र

गुन्हा रद्द करण्यासाठी आव्हाडांची न्यायालयात धाव

गुन्हा रद्द करण्यासाठी आव्हाडांची न्यायालयात धाव
गुन्हा रद्द करण्यासाठी आव्हाडांची न्यायालयात धाव फोटो: ठाणे वैभव
सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण ठाणे : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना झालेल्या मारहाण प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात यासंदर्भातील अर्ज केला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्य्क आयुक्त महेश आहेर यांना आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी जबर मारहाण केली होती. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच हा सर्व मारहाणीचा प्रकार घडला होता. हा मारहाणीचा प्रकार घडण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे आव्हाड यांनीच एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानंतर आक्रमक जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर यांना महापालिकेच्या गेटवरच मारहाण केली होती. या मारहाणीनंतर आहेर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475