जिल्हा

मुख्याध्यापकांनंतर आता शिक्षक रडारवर

मुख्याध्यापकांनंतर आता शिक्षक रडारवर
मुख्याध्यापकांनंतर आता शिक्षक रडारवर फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा क्र. 19 मधील तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 38 मुख्याध्यापकांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसनंतर तीन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्याने शिक्षक देखील रडारवर आले असल्याचे दिसत आहे. कल्याण-डोंबिवली शिक्षण विभागाच्या मनपाच्या 61 शाळांपैकी सुमारे 38 मुख्याध्यापकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा काही दिवसांपूर्वी बजावल्या होत्या. नुकतेच नेतवली येथील मनपा शाळा क्रं 19 प्रबोधनकार ठाकरे शाळेतील तीन शिक्षकांना मासिक अभ्यासक्रम विद्यार्थी चाचणी अंतर्गत काही विद्यार्थ्यामध्ये प्रगती न आढळल्याचा ठपका ठेवत शिक्षण विभाग उप आयुक्त यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कामचुकार आणि कर्तव्यात कुसूर करणाऱ्या शिक्षकांची देखील आता खैर नसल्याचे दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग उपआयुक्त यांनी कडोंमपा अधिकाऱ्यांना शाळांची पालकत्व जबाबदारी देत शाळातील शिक्षण दर्जासह सोयी-सुविधा यांचा आढावा घेत त्या मार्गी लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. नुकताच प्रबोधनकार ठाकरे शाळेचा पाहणी दौरा आयुक्तांनी केला. पहिली ते आठवीपर्यंत सुमारे 450 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे बरोबर देण्यासंदर्भात शिक्षकांना धारेवर धरले होते. एकंदरीत पाहता मनपा शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक दर्जा गुणवत्ता, सोयी-सुविधांबाबत प्रशासनाने दक्ष भूमिका घेतल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475