महाराष्ट्र
अनेक वर्षांनी दातीवली रेल्वे स्थानकाला मिळाले तिकीट घर
अनेक वर्षांनी दातीवली रेल्वे स्थानकाला मिळाले तिकीट घर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकानंतरचे कोकण रेल्वे मार्गांवरील पहिले असलेले दातीवली रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून तिकीट घरापासून वंचित होते. त्यामुळे अनेकांना नाहक तिकीटाअभावी भुर्दंड सोसावा लागत होता.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार आज दातीवली स्टेशन (कोकण रेल्वे) येथे तिकीट घर सुरु झाले आहे. कोकण रेल्वे तसेच दिवा वसई, पनवेल या रेल्वे मार्गावरील स्टेशन दिवा शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच दातिवली गाव येथे असल्याने दिवा शहरातील अनेक प्रवासी, नोकरदार वर्ग पनवेल, वसई रेल्वेमार्गे मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. त्यामुळे येथे तिकीट घराच्या अभावी अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475