महाराष्ट्र

बोगस कागदपत्रे देऊन महाविद्यालयात प्रवेश

बोगस कागदपत्रे देऊन महाविद्यालयात प्रवेश
बोगस कागदपत्रे देऊन महाविद्यालयात प्रवेश फोटो: ठाणे वैभव
* १२ विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल * उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयातील घटना उल्हासनगर : उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई येथील एका कॉलेजच्या नावाने बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून एसएसटी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याप्रकरणी १२ विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प ४ मोरयानगरी येथे एसएसटी कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये २०१८ साली १२ विद्यार्थ्यांनी विक्रोळी येथील संदेश कॉलेजच्या नावाने बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतले होते. ही घटना मुंबई विद्यापीठाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव अशोक घुले यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तब्बल १२ विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अपात्र विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करुन प्रवेश मिळविल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधीत एसएसटी महाविद्यालयाने पोलिसांत तक्रार नोंदविणे अपेक्षित होते, असे अशोक घुले यांनी फिर्यादित नमूद केले आहे. पंरतु एस. एस. टी कॉलेजने असे का केले नाही? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी ४२०, ४५६, ४७१, ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475