जिल्हा

आदर्श विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी स्थापन

आदर्श विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी स्थापन
आदर्श विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी स्थापन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: कासारवडवली येथील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची सन २०२६ पासून नवीन कार्यकारिणी समिती निवडणूक प्रक्रियेद्वारे नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दिगंबर कवरे, सचिव मुख्याध्यापक भास्करराव मगरे, खजिनदार विश्वास मुकादम, सल्लागार सदस्य माजी मुख्याध्यापक मच्छिंद्र तिगोटे, सदस्य लक्ष्मण भोईर, संजय पाटील, मनिषा ठाकूर, प्रविण शिंगे, कैलास राऊत आणि रविंद्र भोईर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
या बरोबरच कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यात असद चाऊस, प्रविण ठाकूर, वत्सला मणेरा, मोहन डाकी, रुपेश पाटील, गणेश चौधरी, सागर पाटील, शौकत शेख, हेमलता भोईर, केशव भोईर, मालती पाटील, पर्वता भोईर आणि तनवीर वरेकर यांचा समावेश आहे. शाळेचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475