जिल्हा

खारीगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई

खारीगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई
खारीगाव येथे अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई फोटो: ठाणे वैभव
जेसीबी, ट्रक व दोन मोटरसायकल जप्त ठाणे: मौजे खारीगाव येथे अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 मे 2025 रोजी रात्री छापा टाकून जेसीबियासह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह तहसिलदार उमेश पाटील व ठाणे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या एक जेसीबी, एक ट्रक व दोन मोटरसायकल जप्त केल्या. हा सर्व ऐवज जवळपास 80 लाखांचा असून या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईत बाळकूम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप, सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ससाने, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सचिन सावंत, नितीन अहिरे व महसूल सहाय्यक हर्षवर्धन गंगावणे हे महसूल कर्मचारी सहभागी होते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, यापुढेही अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475