जिल्हा

अपंग महिलेच्या स्टॉलवर कारवाई; व्हीलचेअर जप्त

अपंग महिलेच्या स्टॉलवर कारवाई; व्हीलचेअर जप्त
अपंग महिलेच्या स्टॉलवर कारवाई; व्हीलचेअर जप्त फोटो: ठाणे वैभव
उबाठाचे व्हीलचेअर आंदोलन ठाणे: नौपाडा परिसरात एका स्टाॅलवर कारवाई करत तेथील अपंग महिलेची व्हीलचेअर जप्त करण्याची कारवाई केल्याचा आरोप करत या प्रकाराविरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने सोमवारी सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर व्हीलचेअर आंदोलन करून संताप व्यक्त केला. गरिबांच्या हातगाड्यांवर हातोडा चालवणारे प्रशासन मोठ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा प्रश्न उपस्थित करत महानगर संघटक महेश कदम यांनी पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. ठाणे शहरातील नौपाडा भागात अतिक्रमण विभागाने नुकतीच कारवाई केली. यामध्ये एका अपंग महिलेच्या स्टाॅलवर कारवाई करण्यात आली. पथक इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी तिची व्हीलचेअरही जप्त केली. माध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरच प्रशासनाने ती व्हीलचेअर परत केली, असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि महानगर प्रमुख महेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. पालिकेच्या कारवाईविरोधात यावेळी घोषणाबाजी देत प्रशासनाच्या कारवाईवर आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनानंतर केदार दिघे आणि महेश कदम यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे नवे उपायुक्त जितेंद्र मुकादम यांना भेटून एक निवेदन दिले. त्यात नव्या नियुक्तीचे अभिनंदन आणि प्रशासनाच्या ‘अपंग’ संवेदनशीलतेचा जाहीर पंचनामा असा उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि कथित घुसखोरांवरील कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कॅमेऱ्यासमोर हातोडा चालतो आणि नंतर पुन्हा अनधिकृत बाजार भरतो, असा आरोप करत ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होत असल्याची टीका पत्रातून करण्यात आली आहे. गरिबांच्या हातगाड्यांवर कारवाई करणारे प्रशासन मोठ्या अनधिकृत इमारतींवर आणि राजकीय वरदहस्त असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा सवाल महेश कदम यांनी उपस्थित केला. दिव्यांग महिलेची व्हीलचेअर जप्त करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा संबंधित प्रभागातील अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांना व्हीलचेअरवर बसवून दाखविण्यात येतील, असा आक्रमक इशारा महेश कदम यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475