महाराष्ट्र

वर्षभरात ९३७३ वाहनांवर कारवाई

वर्षभरात ९३७३ वाहनांवर कारवाई
वर्षभरात ९३७३ वाहनांवर कारवाई फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई शहरात वाढत्या वाहन संख्येबरोबरच वाहतूक नियम देखील तोडले जात आहेत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून एप्रिल २०२३ पासून ते मार्च २०२४ पर्यंत एकूण अशा ९ हजारहुन अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेहमीच सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट लावणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे, डोन्ट ड्रंक अँड ड्राईव्ह याविषयी जनजागृती किली जाते. सुरक्षित वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरीही आद्यप ही वाहन चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत बेशिस्तपणे वाहने चालवतात. कित्येकदा दुचाकीस्वार विना हेल्मेट प्रवास करतात. परिणामी अनावधानाने अपघाताला निमंत्रण दिले जाते आणि हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते. त्याचबरोबर चारचाकी वाहन चालक देखील सीटबेल्ट न वापरता बेफिकिरपणे वाहन चालवतात. शिवाय वाहन चालवताना मोबाईलवर देखील बोलत असतात. वाशी आरटीओ विभागाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत एकूण ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेट आणि योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे इत्यादी त्रुटी असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अशी माहिती वाशी आरटीओमार्फत देण्यात आली आहे. कारवाई प्रकार वाहन कारवाई * विना हेल्मेट ३८७५ * सीटबेल्ट १८८ * वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ३९९ * योग्यता प्रमाणपत्र नसणे ४३६० * सिग्नल तोडणे ७४४

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475