जिल्हा

ज्येष्ठांसाठी डिजिटल बस पासऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरा

ज्येष्ठांसाठी डिजिटल बस पासऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरा
ज्येष्ठांसाठी डिजिटल बस पासऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरा फोटो: ठाणे वैभव
ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे आयुक्तांना निवेदन ठाणे: ठाणे महानगरपालिकेमार्फत टीएमटी बस प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बस पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ही डिजिटल पास काढण्याची प्रक्रिया खर्चिक व त्रासदायक आहे. त्यामुळे ज्येष्ठांसाठी सवलत देण्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या डिजिटल बस पासऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरावे, अशी मागणी ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनने ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आधार कार्डमध्ये नागरिकांची सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असते. त्यामुळे नवीन डिजिटल पास काढण्याची सक्ती करण्यामागे कोणतेही ठोस कारण नसल्याचे ते सांगतात. यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक व मानसिक ताण येत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. तसेच डिजिटल बस पाससाठी दरवर्षी ७७ रुपये शुल्क आकारले जात असून, पास मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दरम्यान, ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष नागले यांनी याबाबत ठाणे पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475