जिल्हा

गटनेतेपदी अभिजीत पवार

गटनेतेपदी अभिजीत पवार
गटनेतेपदी अभिजीत पवार फोटो: ठाणे वैभव
ठाणे: डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अश्रफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेत शानू पठाण यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्याने रिक्त झालेल्या गटनेतेपदावर अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. अभिजीत पवार हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तथा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475