जिल्हा

ठाण्यातील बेवारस वाहनांचे गुन्हेगारी-रोगराईला आमंत्रण

ठाण्यातील बेवारस वाहनांचे गुन्हेगारी-रोगराईला आमंत्रण
ठाण्यातील बेवारस वाहनांचे गुन्हेगारी-रोगराईला आमंत्रण फोटो: ठाणे वैभव
विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची वाहने जप्त करण्याची मागणी ठाणे: ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बेवारस वाहने उभी करण्यात आलेली आहेत. रोगराई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीला आमंत्रण देणारी ही वाहने पोलिसांच्या मदतीने जप्त करावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेऊन केली. पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगारजमा झालेली वाहने उभी करण्यात आली आहेत. या वाहनांचे मालक वाहनांकडे फिरकतही नाहीत. या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वाहने भंगार जमा असल्याने त्याच्या आजूबाजूला लोक कचरा फेकत आहेत. त्यामुळे जिथे ही बेवारस वाहने आहेत, तिथे कचऱ्याचे ढीग लागत आहेत. परिणामी, पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा असल्याने वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहेत. शिवाय, या वाहनांच्या आड बसून अमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याने गुन्हेगारी वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागात एकाच जागेवर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी पठाण यांनी केली आहे. ही वाहने उभी करून जाणाऱ्या वाहनमालकांचा शोध घेऊन पार्किंग दरानुसार दंडवसुली करावी, ही वाहने भंगारात विकावीत. या कार्यवाहीसाठी ठामपाला कोणतीही नवीन आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. मात्र, ठाणेकरांना वाहतूक कोंडी, रोगराई यापासून मोकळा श्वास घेता येईल. या मोहिमेची सुरूवात दिवा, मुंब्रा येथून करावी, अशी मागणीही शानू पठाण यांनी केली. आयुक्तांनीही या मागणीच्या परिपूर्ततेसाठी सकारात्मकता दाखविली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475