महाराष्ट्र

म्हारळमध्ये घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

म्हारळमध्ये घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
म्हारळमध्ये घराची भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगरच्या म्हारळ गावात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नसली, तरी घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. उल्हासनगरच्या म्हारळ गावात निलेश देहेरकर हे वास्तव्याला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या घराची भिंत शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली. देहेरकर यांचे घर उंचावर असल्यामुळे ही भिंत त्यांच्या घराच्या खाली असलेल्या दुसऱ्या घराच्या अंगणात कोसळली. सुदैवाने या घटनेत दोन्ही घरातील कुणालाही इजा झाली नाही. मात्र यात देहेरकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. तर दुसऱ्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या एका रिक्षाचे मात्र नुकसान झाले. या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या महसूल विभागाकडून या ठिकाणी पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सरपंच योगेश देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475