जिल्हा

माणेरे गावालगत जंगलात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

माणेरे गावालगत जंगलात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
माणेरे गावालगत जंगलात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त फोटो: ठाणे वैभव

विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

उल्हासनगर: उल्हासनगरमधील माणेरे गावालगतच्या जंगलात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत हजारो लिटर गावठी दारू नष्ट केली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांना जंगलात सुरू असलेल्या हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. पाहणी दरम्यान अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संपूर्ण साठा जप्त करत नष्ट केला. माणेरे गावालगतच्या जंगल परिसरात मागील काही काळापासून गावठी दारूच्या अड्ड्यांविषयी तक्रारी सातत्याने येत होत्या. या आधीही अशा प्रकारच्या अड्ड्यांवर कारवाई झाली असली तरी हे अड्डे पुन्हा सुरू होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशा गावठी दारू तयार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475