जिल्हा

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील देशमुख कंपाउंड येथे केमिकल गोदामाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत गोदामात साठवण्यात आलेला लाखो रुपयांचा घातक रासायनिक साठा जळून खाक झाला आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांसह दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र केमिकलच्या गोदामात असलेल्या काही ज्वालाग्राही घातक केमिकलमुळे अग्नी रौद्ररूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचे केमिकलचे ड्रम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475