जिल्हा

इमारतीचा स्लॅब कोसळून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
इमारतीचा स्लॅब कोसळून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
ठाणे: शनिवारी सकाळी मुंब्रा भागात एक इमारतीचा स्लॅब कोसळून ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंब्रा भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऎरणीवर आला आहे.
कौसा भागातील सिमला सोसायटी भागातील झुबेदा पार्क ही तळ अधिक चार मजल्यांची इमारत २२ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील नाजनीन शेख यांच्या घराचा स्लॅब शनिवारी सकाळी १० वाजता अचानक कोसळला. यात अब्दुल पटेल हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राईम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऎरणीवर येत असतो, परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वीच इमारत दुर्घटना घडली असून मुंब्रा-कौसा भागातील अनधिकृत धोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475