जिल्हा
रिक्षा चोराच्या आवळल्या मुसक्या
रिक्षा चोराच्या आवळल्या मुसक्या
फोटो: ठाणे वैभव
तीन रिक्षा हस्तगत
नवी मुंबई: घणसोली परिसरातून सुहास कोटकर यांची रिक्षा चोरीला गेली होती. याबाबत रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने तपास करत आरोपी महेश गवळे (२०) याला चिंचपाडा, रबाळे एमआयडीसी येथून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गुन्हांची नोंद असून त्याचा रिक्षा चोरीच्या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडून रिक्षा क्र. एमएच ४३ बीएफ २८७०, रिक्षा क्र.एमएच ४३ बीएफ ८२०१ आणि रिक्षा क्र.एमएच ४३ बीआर २३१३ अशा तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या तपास पथकात रबाळे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार दर्शन कटके, मयूर सोनवणे, गणेश वीर, धनाजी भांगरे, पोलिस शिपाई यादवराव घुले व मनोज देडे सहभागी होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475