जिल्हा

इच्छुकांचा राजकीय स्वप्नभंग; महापालिकेचे दरवाजे तूर्त बंद!

इच्छुकांचा राजकीय स्वप्नभंग; महापालिकेचे दरवाजे तूर्त बंद!
इच्छुकांचा राजकीय स्वप्नभंग; महापालिकेचे दरवाजे तूर्त बंद! फोटो: ठाणे वैभव
स्वीकृत, परिवहन आणि विशेष समित्यांचे अर्जवाटप बंद, महासभाही रद्द ठाणे: ठाणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती सदस्य आणि पाच विशेष समित्यांच्या ५ मार्च रोजी होणाऱ्या नियुक्तीला अचानक ब्रेक लागल्याने ठाणे शहरात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. काल महापालिकेतील दहा स्वीकृत सदस्य, परिवहन समितीमधील १२ सदस्य आणि महिला व बाल्कल्याण, क्रीडा आणि सांस्कृतिक, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सुधारणा, आरोग्य आणि शिक्षण मंडळ या पाच समितीच्या सदस्य निवडीकरिता ५ मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वीकृत आणि परिवहन समिती सदस्य पदाकरिता आज बुधवारपासून २७ फेब्रुवारीपर्यंत अर्जवाटप सुरु करण्यात आले होते. या समितीकरिता इच्छुक असलेल्या दोन जणांनी महापालिकेच्या सचिव विभागातून अर्ज देखिल घेतले होते, परंतु दुपारी अचानक महापालिका प्रशासनाने अर्जवाटप बंद केले. त्यामुळे अर्ज घेण्यासाठी आलेल्या इच्छुकांना हात हलवत परत जावे लागले होते. अर्जवाटप अचानक का बंद केले याची माहिती मिळत नव्हती. महापालिकेतील कोणीच त्याबाबत बोलायला तयार नाही. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. ही सभा पुन्हा कधी होईल याची कोणालाही कल्पना नाही. महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजपा असे युद्ध सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक ७५ नगरसेवक आणि एक अपक्ष पाठिंबा असे ७६ सदस्यांचे बळ सेनेकडे आहे तर भाजपाकडे २८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १२, अजितद पवार राष्ट्रवादीकडे नऊ, एमआयएमकडे पाच आणि उबाठाकडे एक असे संख्याबळ आहे. त्यानुसार सेनेला सहा, भाजपाला दोन, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य मिळणार आहे, परिवहन समितीमध्ये नवी मुंबईप्रमाणे निवडणूक झाली तर सेनेला बाराही जागा मिळू शकणार होत्या. विशेष समितीवर देखिल सेनेचे वर्चस्व निर्माण होणार होते, परंतु ही सभाच रद्द करण्यात आल्याने इच्छुकांना महासभेची वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475