महाराष्ट्र

कळव्यात चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला

कळव्यात चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला
कळव्यात चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कळवा येथील पारसिक नगर परिसरात पोलीस अधिकारी राहतात. ते मुंबई पोलीस दलात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या परिसरातील सार्वजनिक रस्त्याकडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले. शनिवारी सकाळी ते दुचाकी धुण्यासाठी इमारतीखाली उतरले. त्यावेळी त्यांना रस्त्याकडेला उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने देखील त्यांची दुचाकी कारवाई करून नेली नव्हती. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475