जिल्हा

मध्य प्रदेशमध्ये पिस्तूल बनवण्याचा कारखाना

मध्य प्रदेशमध्ये पिस्तूल बनवण्याचा कारखाना
मध्य प्रदेशमध्ये पिस्तूल बनवण्याचा कारखाना फोटो: ठाणे वैभव
* ठाण्यात अटक आरोपींनी दिली माहिती * १७ पिस्तुल, ३१ मॅगझीन १२ जिवंत का जप्त ठाणे : राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने सापळा रचून 1 जून रोजी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर १७ पिस्तुल, ३१ मॅगझीन १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये पिस्तूल बनवण्याचा कारखाना असून आरोपी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे मालमत्ता गुन्हे शोध पथकास काही जण राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकेत कॉम्प्लेक्सजवळील ब्रिजवर पिस्तुल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती १ जून रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 1 जून रोजी सायंकाळी या ठिकाणी सापळा रचून पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या रमेश मिसरिया किराडे बिलाला (25) आणि मुन्ना अमाशा अलवे बारेला (34, दोघेही राहणार - पाचोरी गाव, जिल्हा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन देशी बनावटीची पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आणि सहा मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल जप्त करीत दोघांना अटक केली. या दोघा आरोपींच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि त्याची विक्री कारण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, अटकेतल्या आरोपींनी पिस्तुल कोठून आणले याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत असतांना दोघा आरोपींनी त्यांच्या मूळ गावात आणखी पिस्तुलांचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात असलेल्या पाचोरी या गावात पोहचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने यावेळी 14 देशी बनावटीचे पिस्तुल, 25 मॅगझीन, आठ जिवंत काडतुसे असा साठा जप्त केला. या दोघांकडून आतापर्यंत एकूण १७ पिस्तुल, 31 मॅगझीन व 12 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांनी दिली. मध्यप्रदेशात पिस्तुल बनवण्याचा कारखाना? ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मध्य प्रदेशात हत्यार बनवण्याचा कारखाना असून आम्ही फक्त हे पिस्तुल विक्री करतो अशी कबुली दोघांनी पोलीस तपासात दिली आहे. ग्राहक श्रीमंत असेल तर त्यास 50 हजार ते 90 हजारात आणि ग्राहक कमी पैसेवाले असतील तर त्यांना 20 हजारापर्यंत पिस्तुल विक्री करण्यात येत होती, अशी देखील माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475