जिल्हा

दरवाजात उभा राहिल्याने प्रवाशाला बेदम मारहाण

दरवाजात उभा राहिल्याने प्रवाशाला बेदम मारहाण
दरवाजात उभा राहिल्याने प्रवाशाला बेदम मारहाण फोटो: ठाणे वैभव
ठाणे : दरवाजात उभे राहिल्याने एका प्रवाशाला दिवा स्थानकात १० ते १२ प्रवाशांनी रेल्वेगाडीतून खाली खेचून फलाटावर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. परंतु या प्रकरणात मारहाण झालेल्या व्यक्तीने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिल्याने याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वीच्या या मारहाणीचे चित्रीकरण प्रसारित झाले. दिवा रेल्वे स्थानकात कर्जत रेल्वेगाडी आली असता, रेल्वेगाडीत प्रवाशांच्या चढण्या-उतरण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादात कर्जत येथे राहणाऱ्या एका प्रवाशास दिवा रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांनी खेचून रेल्वेगाडीतून बाहेर काढले. त्यानंतर या प्रवाशांच्या टोळीने त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान याप्रकरणात मारहाण झालेल्या व्यक्तीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परंतु त्याने याप्रकरणात तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475