जिल्हा
इमारतीच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण
इमारतीच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: अंबरनाथच्या पूर्व भागातील पालेगाव परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्टमध्ये झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शुक्रवारी 4 जुलै रोजी घडलेल्या घटनेचा गुन्हा मंगळवारी 8 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी तक्रारदार फिर्यादी शंकरलाल पांडे यांचा मुलगा क्लासला जाण्यासाठी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून लिफ्टने खाली जात असतांना नवव्या मजल्यावर लिफ्ट येताच त्याच इमारतीत राहणारे कैलास तनवाणी यांनी लिफ्टमध्ये फिर्यादी पांडे यांच्या मुलाला मारहाण केली. तसेच यावेळी मारहाण होत असतांना लिफ्टमध्ये असलेल्या सफाई कर्मचारी महिलेने तनवाणी यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तनवाणी यांनी मारहाण सुरू ठेवली, तसेच लिफ्टच्या बाहेर येताच सोसायटीमधील लोकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता तरीही ते मारहाण करत ' तू बाहेर भेट तुला चाकूने मारतो, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.
300x450
300x600