जिल्हा

डोंबिवलीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला भीषण आग

डोंबिवलीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला भीषण आग
डोंबिवलीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला भीषण आग फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : एमआयडीसीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसोल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे बोलले जात आहे. अग्निशमनच्या चार गाड्यांच्या मदतीने जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचे महत्त्वाचे काम केले. एमआयडीसीत फेज एकमधील ही एरोसोल कंपनी आहे. या कंपनीत कापडावर प्रक्रिया करण्याचे काम होत होते. बुधवारी दुपारच्या वेळेत अचानक कंपनीत आग लागली. कपडा असलेल्या ठिकाणी आग पसरताच आग मोठ्या प्रमाणावर लागली. परंतु आग लागल्याचे कंपनीतील कर्मचारी, कामगार यांना समजताच सर्वजण तत्काळ बाहेर पडले. अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या देखरेखीखाली त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी लवकरच आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आगजवळच्या कंपन्यांच्या भागात पसरणार नाही याची काळजी घेतली. आग कशामुळे लागली हे अद्याप निश्चित समजू शकले नाही. परंतु, शॉर्टसर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करताना काही तांत्रिक कारणामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएश (कामा) चे माजी अध्यक्ष देवेन सोनी आणि इतर पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475