जिल्हा

एलरिक्षाचालकांच्या मुजोरीविरुद्ध प्रवाशांचा भर पावसात रास्तारोको

एलरिक्षाचालकांच्या मुजोरीविरुद्ध प्रवाशांचा भर पावसात रास्तारोको
एलरिक्षाचालकांच्या मुजोरीविरुद्ध प्रवाशांचा भर पावसात रास्तारोको फोटो: ठाणे वैभव
ठाणे : रिक्षा चालकांच्या मनमानीविरोधात प्रवाशांनी भर पावसात उत्स्फूर्तपणे रस्ता रोको आंदोलन केल्याने गोखले रॊडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गावदेवी मार्केट येथे लोकमान्य नगर, नितीन कंपनी, वागळे या भागातील प्रवाशांकरिता शेअर रिक्षाची सोय केली आहे. एरवी येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रिक्षाचालक २५ रुपये भाडे घेत होते, परंतु मागिल दोन दिवस पावसाची रिपरिप सुरु असल्याने याचा फायदा उचलत रिक्षा चालकांनी प्रत्येक प्रवाशाकडून ४० रुपये भाडे घेण्यास सुरुवात केली होती. एका एका रिक्षात चार ते पाच प्रवासी कोंबले जातात. आज प्रवाशांनी नेहमीप्रमाणे २५ रुपये भाडे आकारणी करण्याची विनंती केली होती, परंतु मुजोर रिक्षा चालकांनी प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन ४० रुपये भाड्यावर ठाम राहिले. त्यांनी प्रवासी भाडे नाकारले, पोलिसांची विनंती देखिल रिक्षा चालक मानायला तयार नसल्याने अखेर प्रवाशांनी वारंवार विनंती केल्यानंतर देखिल भाडे घेण्यास रिक्षा चालकांनी नकार दिल्यामुळे प्रवाशांनी भर पावसात रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्याचा परिणाम गोखले रोडवरील वाहतुकीवर झाला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475