जिल्हा

आधारवाडी तुरुंगात गृहरक्षकाला न्यायबंद्याची मारहाण

आधारवाडी तुरुंगात गृहरक्षकाला न्यायबंद्याची मारहाण
आधारवाडी तुरुंगात गृहरक्षकाला न्यायबंद्याची मारहाण फोटो: ठाणे वैभव
कल्याण: येथील आधारवाडी तुरुंगात सोमवारी संध्याकाळी एका न्यायबंदीने एका गृहरक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गृहरक्षकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी न्यायबंदी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पंकज यादव असे मारहाण करणाऱ्या न्यायबंदीचे नाव आहे. विनायक भालेराव असे आधारवाडी कारागृहातील गृहरक्षकाचे नाव आहे. आधारवाडी तुरुंगातील रुग्णालय कक्षात हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. गृहरक्षक भालेराव यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की न्यायबंदी पंकज यादव यांना आपण तुरुंगातील मुलाखत कक्षातून घेऊन रुग्णालय कक्षात परत येत होतो. मुलाखत कक्ष ते रुग्णालय कक्षादरम्यान न्यायबंदी पंंकज यांनी गृहरक्षक भालेराव यांना, तू माझी मुलाखत पूर्ण होऊ दिली नाही. माझी मुलाखत अर्धवट राहिली, असे बोलून पंकज यांनी भालेराव यांना हातवारे करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी गृहरक्षक भालेराव यांनी तुमची मुलाखत अर्धवट राहिलेली नाही. तुम्ही माझ्याशी नीट बोला. हे वाक्य पूर्ण होताच न्यायबंदी पंकज यादव यांनी रागाच्या भरात गृहरक्षक भालेराव यांच्या अंगावर धाऊन जाऊन त्यांंच्या सदऱ्याची गळपट्टी पकडली. अचानक न्याय बंदीने हल्ला केल्याने भालेराव यांंनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या पंकज यांनी भालेराव यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. त्यांचा सदरा आणि गळपट्टी पकडली. या झटापटीत भालेराव यांच्या गणवेशावरील शासकीय खुणांची पट्टी तुटली. इतर कर्मचारी धाऊन आल्यानंतर भालेराव यांची सुटका झाली. सरकारी कामात पंकज यांनी अडथळा आणला म्हणून भालेराव यांनी त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमाने गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जी. जोशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475