जिल्हा

रुळावर चार फुटाचा लोखंडी तुकडा, तेवढ्यात लोकल आली...

रुळावर चार फुटाचा लोखंडी तुकडा, तेवढ्यात लोकल आली...
रुळावर चार फुटाचा लोखंडी तुकडा, तेवढ्यात लोकल आली... फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा कट नवी मुंबई: नवी मुंबई परिसरात रेल्वेचा भीषण अपघात घडवून आणण्याचा मोठा डाव नवी मुंबई परिसरात उघड झाला आहे. एका अज्ञात व्यक्तीने रुळावर चार फूट लांबीचा लोखंडी तुकडा ठेवून लोकलमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञात व्यक्तीकडून ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर-नेरूळ दरम्यानच्या रुळावर चार फूट लांबीचा लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा टाकून ठेवला होता. सुदैवाने ठाणे येथून नेरूळ येथे लोकल घेऊन येत असलेल्या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळावर पडलेला लोखंडी रुळाचा तुकडा निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली. मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी तुकडा निदर्शनास आला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे पोलिसांनी लोकलचे मोटरमन शशीकुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे लोकलची मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. याच लोखंडी रेल्वे रुळाच्या तुकड्याला लोकलची धडक बसून लोकल गाडीचा कॅटील गार्ड वाकून त्याला तडा गेला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लोकल त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्याने लोकलमधील प्रवाशांना पायी चालत नेरूळ रेल्वे स्थानक गाठावे लागले होते. या प्रकारामुळे ऐन सकाळच्या वेळी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475