जिल्हा

गजानन मार्केटमधील कपड्यांच्या दुकानाला आग

गजानन मार्केटमधील कपड्यांच्या दुकानाला आग
गजानन मार्केटमधील कपड्यांच्या दुकानाला आग फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगरच्या गजबजलेल्या कॅम्प दोनमधील गजानन मार्केटमध्ये आज अचानक लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडाली आहे. या आगीत कपड्याचे दुकान जळून खाक झाले असून, दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य काही क्षणातच राख झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने दाखल झाल्या असून, जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले आहे. या आगीच्या दुर्घटनेने मार्केटमधील अन्य दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विचार सुरू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, आणि प्रशासनाने मार्केटमधील दुकानदारांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475