महाराष्ट्र

एक केळे जादा घेतल्याने चौघांत मारामारी

एक केळे जादा घेतल्याने चौघांत मारामारी
एक केळे जादा घेतल्याने चौघांत मारामारी फोटो: ठाणे वैभव
दोन जणांवर गुन्हा दाखल भिवंडी: शहरातील कामतघर भागात हातगाडीतील जास्तीचे एक केळे घेण्यावरून दोन पक्षांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. नारपोली पोलिसांनी केळी विकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडप डेकोरेटरचे काम करणाऱ्या तुषार पाटेकर याने हनुमान मंदिराजवळ एका हातगाडीतून अर्धा डझन केळी खरेदी केली होती. पाटेकर यांनी त्यांचा मित्र साईनाथ जाधव यांच्यासोबत गाडीतून आणखी एक जास्तीचे केळे घेतले. त्या एका केळ्याच्या पैशासाठी केळी विकणाऱ्या राम नारायण गुप्ता याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, राम नारायण गुप्ता यांचा मुलगा संजय गुप्ता याने त्या ठिकाणी येऊन त्याच्या हातगाडी खालून लोखंडी रॉड काढून दोघांवर हल्ला केला. ज्यामध्ये तुषार पाटेकर आणि साईनाथ जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नारपोली पोलिसांनी तुषार पाटेकर यांच्या तक्रारीवरून राम गुप्ता आणि संजय गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळी करीत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475