जिल्हा

मुंब्रा खाडीत सलग दुसऱ्या दिवशीही मृतदेह आढळला

मुंब्रा खाडीत सलग दुसऱ्या दिवशीही मृतदेह आढळला
मुंब्रा खाडीत सलग दुसऱ्या दिवशीही मृतदेह आढळला फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये गुरुवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी एका पुरूषाचा मृतदेह आढळला आहे. या लागोपाठ घडलेल्या घटनेमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या दोन्ही मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. मुंब्रा येथे गणेश विसर्जन घाटजवळ असलेल्या रेतीबंदर खाडीमध्ये शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास एका अज्ञात पुरूषाचा (अंदाजे वय २५ ते ३०) मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी मुंब्रा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. यावेळी पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे. या व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475