जिल्हा

मिरवणूक काढल्याप्रकरणी ड्रग्ज माफियांविरुद्ध गुन्हा दाखल

मिरवणूक काढल्याप्रकरणी ड्रग्ज माफियांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरवणूक काढल्याप्रकरणी ड्रग्ज माफियांविरुद्ध गुन्हा दाखल फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपींनी फटाके वाजवत मिरवणूक काढली. जमावबंदीचे आदेश असताना जमावबंदी केली. याप्रकरणी आरोपीसह इतर आरोपींना अटक करून त्यांच्यावर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून अमली पदार्थ विक्रीचा मोठा डीलर कामरान खान हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता. १६ जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला. त्याची सुटका झाल्यानंतर ठाणे करागृहाबाहेर अंमली पदार्थ विक्रीतील आरोपी यांनी जंगी स्वागत केले. काशीमीरा ते मिरा रोड, नयानगरपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. मिरा रोड परिसरात फटाके वाजवले. त्यानंतर या सर्व प्रकारचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या व्हिडिओमध्ये १६ जुलै रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर कामरान मोहोम्मद खानचे त्याच गुन्हयातील त्याचे साथीदार व त्याच गुन्हयामध्ये जामीनावर असलेले आरोपी फहाद अब्दुल सय्यद, राशीद अस्लम शेख हे रेकॉर्डवरील गुन्हेगार कामरान याचे इतर समर्थक दिलावर पठाण, समिर युसुफ शेख, फरहान मोहोम्मद खान, अदनान मोहोम्मद खान, शरिफ, हैदर काटा, आसिफ यांच्यासह इतर अंदाजे ३० ते ३५ अनोळखी समर्थक यांनी ठाणे कारागृह येथे जमा होवून कामरान मोहोम्मद खान याची सत्र न्यायालय, ठाणे यांनी जामिनावर मुक्तता केल्याने पाच वाहनांमधुन नयानगर येथे लोधा रोड मुझम्मल शेगडी हॉटेलजवळ विना परवाना एकत्र येवून त्या सेलीब्रेशनची व्हिडीओ क्लीप बनवुन ती व्हायरल केली. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा भाईंदर, वसई विरार यांनी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन, गैरकायद्याची मंडळी जमा करून, लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. नयानगर पोलीसांना माहिती मिळताच पोलीसांनी आरोपींना नयानगर परीसरात त्यांची वरात काढत पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475