जिल्हा

धाडसी पाठलाग करून कार चोराच्या आवळल्या मुसक्या

धाडसी पाठलाग करून कार चोराच्या आवळल्या मुसक्या
धाडसी पाठलाग करून कार चोराच्या आवळल्या मुसक्या फोटो: ठाणे वैभव
बेळगावहून चोरी करून आणलेली महागडी कार ठाण्यात जप्त ठाणे : कापूरबावडी वाहतूक विभागाने धाडसी आणि समयसूचकता दाखवत बेळगाव येथून चोरी करून आणण्यात आलेली किया कंपनीची सेल्टोस कार जप्त करण्यात यश मिळवले. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गोल्डन क्रॉस परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कापूरबावडी वाहतूक विभागाला संदेश प्राप्त झाला. नवी मुंबई हद्दीतून चोरीची किया सेल्टोस कार (केए २२ एमसी ८१२२) ठाणे शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती देण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अश्रू हाके, उपनिरीक्षक सागर सांगवे आणि सहकाऱ्यांनी गोल्डन क्रॉस येथे संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालून भरधाव वेगाने घोडबंदर रोडच्या दिशेने पलायन केले. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत एका डिलिव्हरी बॉयची पल्सर दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला. घोडबंदर दिशेने तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी स्वतः पाठलाग केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळमार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. आरोपी वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता तसेच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता. अखेर विजय गार्डन सिग्नलजवळ पोलिसांनी कार अडवण्यात यश मिळवले. मात्र चालक कार सोडून पळून गेला. त्यानंतरही पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी आरोपीचा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत धावत पाठलाग केला. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा शर्ट पोलिसांच्या हातात आला, मात्र आरोपीने आडोशाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, जप्त करण्यात आलेली चोरीची कार कापूरबावडी वाहतूक विभागात आणण्यात आली. त्यानंतर कारचे मालक राहुल जाधव तसेच बेळगाव पोलिसांनी ठाण्यात येऊन कारची ओळख पटवली असून पुढील कारवाईसाठी वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475