महाराष्ट्र

महिलेच्या पोटातून काढला दहा किलोंचा पाण्याने भरलेला गोळा

महिलेच्या पोटातून काढला दहा किलोंचा पाण्याने भरलेला गोळा
महिलेच्या पोटातून काढला दहा किलोंचा पाण्याने भरलेला गोळा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : महिलेच्या पोटात तब्बल दहा किलोचा पाण्याने भरलेल्या मांसाच्या गोळ्याची अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी व त्यांच्या सहका-यांनी यशस्वी केली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या सहका-यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढला. सामान्य रुग्णांसाठी सिव्हील रुग्णालय देवदूत ठरत असून, अत्यंत जटिल आणि खिशाला न परवडणा-या शस्त्रक्रिया मोठ्या कुशलतेने केल्या जात आहेत याचा प्रत्यय सोमवारी दिसून आला. उल्हासनगरात भाजी विक्री करणा-या एका ४८ वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होते. परंतु तिची परिस्थिती सामान्य असल्यामुळे पोटाची तपासणी करायची, कशी शस्त्रक्रिया करावी असा प्रश्न तिच्या कुटुंबाला भेडसावत होता. त्या दुखण्याकडे दुर्लक्षच करत गेल्या. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेची शस्त्रक्रिया केली आणि पोटातील सुमारे दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढला असल्याची माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी दिली. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन काढल्यानंतर त्यांच्या पोटात पाण्याने भरलेला मांसाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती. परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि सहकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. *महिलांच्या पोटातील मांसाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखे, दुखणे, अपचन आणि नैसर्गिक विधी करताना होणारा त्रास आदी लक्षणे आढळतात. काहीवेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475