जिल्हा

खारीगावमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

खारीगावमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
खारीगावमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

ठाणे: कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने अनेकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक गंभीर तर एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.

शुभांगी पाटील (४५) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर कारचालकाचे नाव अभिषेक कदम (३१) असे असून तो कुर्ला येथे राहणारा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कदम हा कारचालक खारीगाव येथील एका सोसायटीमध्ये आपल्या आतेभावाकडे आला होता. याच सोसायटीच्या पार्किंगमधून आपली आर्टिक गाडी हायवेकडे जाण्यासाठी अरुंद रस्त्यावरून नेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने परिसरातील नागरिकांना धडक दिली. या अपघातातशुभांगी पाटील यांना अक्षरशः फरफटत नेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढे जाऊन या कारने एका दाम्पत्याला धडक दिली. यामध्ये एक जखमी झाला तर एका तरुणाला देखील धडक बसल्याने तो देखील यामध्ये किरकोळ जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सुरू आहे. वाहन चालकाने नशेचे पदार्थ किंवा मद्यप्राशन केले होते का याचा वैद्यकीय अहवाल देखील डॉक्टरांकडून मागवला आहे. या घटनेमुळे खारीगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटीच्या आवारात वाहनांची सुरक्षितता आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475