जिल्हा

नवी मुंबईत पाणीकपात रद्द

नवी मुंबईत पाणीकपात रद्द
नवी मुंबईत पाणीकपात रद्द फोटो: ठाणे वैभव

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात लागू करण्यात आलेली पाणी कपात ५ सप्टेंबरपासून रद्द करण्याच्या सूचना महापौर सुजाता पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारपासून शहरातील पाणीकपात रद्द केल्याने ऐन उत्सवांच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मोरबे धरणातील जलसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने तसेच संभाव्य कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने सोमवार २५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नवी मुंबई शहरात विभागवार आठवड्यातील दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. मात्र २५ ऑगस्ट रोजी आगामी सण उत्सवानिमित्त महापौर सुजाता पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत ५ सप्टेंबर दहीहंडी उत्सवापासून शहरातील पाणी कपात रद्द करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना २४ तास पाणी मिळणार असल्याने उत्सवाच्या काळात दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या ९१.७८टक्के पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप १.६४ मीटर पाणी पातळी     गाठावी लागणार असून  सप्टेंबर  अखेर जोरदार पाऊस पडला तर ही पातळी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475