जिल्हा

ठामपा आणि झेडपीच्या शाळा कात टाकणार

ठामपा आणि झेडपीच्या शाळा कात टाकणार
ठामपा आणि झेडपीच्या शाळा कात टाकणार फोटो: ठाणे वैभव

* जिल्हा नियोजन समितीमधून २०टक्के निधी

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून २०टक्के निधी खर्च करून शाळा दुरुस्ती, सुशोभीकरण आणि शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांचा लवकरच कायापालट होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणात असून अनेक शाळांमध्ये दुरावस्था आहे. अनेक शाळांची दुरुस्ती बाकी असून शाळांमध्ये असलेल्या गैरसोयींमुळे पालकवर्गाचा सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देण्याचा कल वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी, सुशोभीकरणासाठी तसेच या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना चांगले आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दोन्ही यंत्रणांना दिल्या आहेत. मुलांमध्ये शाळेप्रती ओढ निर्माण व्हावी यासाठी शाळा सुशोभिकरणासोबतच अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यापूर्वी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून केवळ पाच टक्के निधी दिला जात होता. मात्र आता शाळांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी २० टक्के निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील शाळांचा संपूर्ण  कायापालट होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475