जिल्हा

सहा नव्या लोकल फेऱ्या, दोन अतिरिक्त एसी लोकल

सहा नव्या लोकल फेऱ्या, दोन अतिरिक्त एसी लोकल
सहा नव्या लोकल फेऱ्या, दोन अतिरिक्त एसी लोकल फोटो: ठाणे वैभव

दहिसर-विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

भाईंदर: पश्चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल सेवांचे सुधारित वेळापत्रक १ सप्टेंबर २०२६पासून लागू झाले आहे. प्रवाशांची मागणी, गर्दीची ठिकाणे आणि लोकलच्या वेळेतील विलंब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वेळापत्रकात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. विशेषतः दहिसर, भाईंदर, विरार आणि डहाणू रोड परिसरातील प्रवाशांना या बदलांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेने एकूण लोकल फेऱ्यांची संख्या वाढवलेली नसून दररोजच्या १,४१४ फेऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, कमी प्रवासी मागणी असलेल्या सहा फेऱ्या रद्द करून त्यांच्या जागी सहा नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध रेल्वे मार्गांचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नव्या वेळापत्रकातील विशेष बाब म्हणजे भाईंदर ते विरार सकाळची नवीन लोकल सुरू करण्यात आली आहे. ही लोकल भाईंदरहून सकाळी ७.४६ वाजता सुटून ८.१२ वाजता विरारला पोहोचेल. त्यामुळे भाईंदर, मिरा रोड, दहिसर आणि विरार परिसरातील प्रवाशांना सकाळच्या वेळेत अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

तसेच रात्रीच्या वेळेत बोरिवली-भाईंदर, बोरिवली-विरार आणि विरार-बोरिवली या मार्गांवर नव्या फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उशिरा कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

या वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे दादर ते डहाणू रोड थेट लोकल सेवा. सुधारित वेळापत्रकानुसार दादरहून सायंकाळी ५.२२ वाजता सुटणारी सेवा थेट डहाणू रोडपर्यंत धावेल आणि सुमारे ७.३० वाजता डहाणू रोडला पोहोचेल. यामुळे दादर, अंधेरी, बोरीवली, विरार, पालघर परिसरातून डहाणू रोडकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सकाळी ७.५९ वाजताची विरार-चर्चगेट सेवा एसी लोकलमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. तसेच सकाळी ८.२३ वाजताची विरार-दादर लोकल आता चर्चगेटपर्यंत वाढविण्यात आली असून ती सकाळी ९.४८ वाजता चर्चगेटला पोहोचेल. त्यामुळे विरार आणि पुढील उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475