जिल्हा

आज शरद पवार गटाची क्लस्टर कार्यालयावर धडक

आज शरद पवार गटाची क्लस्टर कार्यालयावर धडक
आज शरद पवार गटाची क्लस्टर कार्यालयावर धडक फोटो: ठाणे वैभव

ठाणे : शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवार २७ ऑगस्ट रोजी हजारो ठाणेकरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तीन हात नाका-कशीश पार्क ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली. 

खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच, ठाणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले आहे, असा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या उपस्थितीत मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात येणार आहे. 

 मोर्चात किमान तीन हजार ठाणेकर नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतरही क्लस्टर कंपनी रद्द करून नियोजनपूर्वक विकास केला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रधान यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475