जिल्हा

मुंब्रा-कळव्यात दोन लाख मतदारांची नावे गायब

मुंब्रा-कळव्यात दोन लाख मतदारांची नावे गायब
मुंब्रा-कळव्यात दोन लाख मतदारांची नावे गायब फोटो: ठाणे वैभव

एसआयआरच्या माध्यमातून विरोधक संपवण्याचा डाव-आव्हाड

ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील तब्बल दोन लाख मतदारांची नावे कापण्यात आली असून, एसआयआरच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते समीर शमीम खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी  जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानु पठाण, सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड, कळवा-मुंब्रा विभागाचे अध्यक्ष शमीम खान, पक्षाचे नगरसेवक आणि धर्मगुरूनसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी एसआयआरच्या माध्यमातून विरोधातील प्रबळ नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल, अशी स्थिती कधीच नव्हती. त्यांच्या पक्षाचा पराभव जेवढ्या मतांनी झाला आहे. तेवढीच मते एसआयआरमध्ये कापण्यात आली होती, हे उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने ही नावे चुकून कापली आहेत, असे स्पष्टीकरणही दिले आहे. तमीळनाडूमध्ये स्टॅलिन कसे काय पराभूत होऊ शकतात, स्टॅलिन फक्त १५०० मतांनी हरले. ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना षडयंत्र करून हरविण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, त्यांचेच हे षडयंत्र आहे. जो कोण मजबूत उमेदवार असेल, त्या उमेदवाराची एसआयआरच्या माध्यमातून मते कापा आणि त्यांना पाडा, हेच धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे झेन झी म्हणजे ज्यांनी वयाची ३० वर्षे ओलांडलेली नाहीत आणि ३० वर्षांच्या आत आहेत आणि जे तरुण १८ च्या पुढे आहेत, त्यांनी येत्या काही दिवसांत फॉर्म नंबर सहा भरावेत आणि मतदार व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. आपल्याला कोणाचेही भय बाळगण्याचे कारण नाही. पण मत नोंदणी करणे ही आपल्या पक्ष संघटनेची जबाबदारी आहे. संघटनेने जबाबदारीने तरुणांपर्यंत पोहोचून काम केले पाहिजे. निवडणुकीला आता अडीच वर्षे बाकी आहेत, मात्र, निवडणूक लवकरही घेऊ शकतात, कधीही घेऊ शकतात. यांचा काही भरवसा नाही. निवडणूक कधीही येऊ दे, पण आपली तयारी आजपासून सुरू झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475