जिल्हा

पाण्यासाठी भाजपाचा कडोंमपावर चमचा मोर्चा

पाण्यासाठी भाजपाचा कडोंमपावर चमचा मोर्चा
पाण्यासाठी भाजपाचा कडोंमपावर चमचा मोर्चा फोटो: ठाणे वैभव

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक भागात पाणी समस्या नवीन नाही. नागरिकांना पाणी टंचाईला जाणवत असल्याने भाजपने  नागरिकांसह बुधवारी डोंबिवलीतील बालाजी आंगण येथील पालिकेच्या कार्यालयावर चमचा मोर्चा काढला. 


यावेळी भाजपा कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, भाजपा नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका डॉ. सुनिता पाटील,  पदाधिकारी मनोज घरत यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.


यावेळी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब म्हणाले, पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा भेटूनही पाणी समस्या दूर होत नाही, म्हणून हे जनआंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा विभाग जर म्हणत असेल की कर्मचारी संख्या कमी आहे तर येत्या सर्वसाधारण सभेत भाजपा गटनेते शशिकांत कांबळे हे हा विषय आणतील.भाजपा गटनेते शशिकांत कांबळे म्हणाले, नागरिकांना पाणी पुरवठा न करणाऱ्या या प्रशासनाचा निषेध करण्याकरता हा मोर्चा काढण्यात आला आहे. कर्मचारी संख्या कमी आहे ही सबब आम्ही  खपवून घेणार नाही.


भाजपा नगरसेवक महेश पाटील म्हणाले, एक महिन्यापासून प्रभाग क्र. १९ व २७ या भागात पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. आम्ही वारंवार पालिका आयुक्त अभिनव गोयल व येथील पालिकेच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांना भेटलो. मागील दहा वर्षांपासून पाणी समस्या नव्हती. मात्र आताच पाणी समस्या जाणवू लागली आहे. पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने हा चमचा मोर्चा काढावा लागला. यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475