जिल्हा

जिल्ह्यात ७४ टक्के आरटीई प्रवेश पूर्ण

जिल्ह्यात ७४ टक्के आरटीई प्रवेश पूर्ण
जिल्ह्यात ७४ टक्के आरटीई प्रवेश पूर्ण फोटो: ठाणे वैभव
प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू ठाणे : जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार, यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. आज, २८ एप्रिल, २०२५ रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक ३ मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ ते ७ मे २०२५ या कालावधीत पूर्ण करायची आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती एसएमएसद्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील 'अर्जाची स्थिती' या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी ७ मे २०२५पर्यंत पूर्ण करावी लागेल. ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६२७ पात्र शाळांमध्ये ११,३२० रिक्त जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ८,३५८ प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा ३ अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475