जिल्हा

भिवंडीत ६६ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपीला अटक

भिवंडीत ६६ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपीला अटक
भिवंडीत ६६ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त, आरोपीला अटक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: भिवंडी परिसरात ६६ ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली असून, आरोपीला आरोपीला अटक करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर २४ रोजी रात्री पावणेदहा वाजता भिवंडी येथील पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक दोन यांना मिळालेल्या माहितीवरुन नाशिककडून ठाण्याकडे जाणा-या सेवा रस्त्यावर माणकोली भिवंडी येथे सापळा रचला होता. सापळ्यातील व्यक्ती उमरान खान (२५) याच्याकडे ६६ ग्रॅम वजनाची एम.डी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ, विवा कंपनीचा फोन आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख १७ हजार २५० रुपये किमतीचा ऐवज सापडला. या घटनेबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन व्यक्तींविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475