जिल्हा

राष्ट्रीय लोकअदालतीत उल्हासनगरमधून ६१२ प्रकरणे

राष्ट्रीय लोकअदालतीत उल्हासनगरमधून ६१२ प्रकरणे
राष्ट्रीय लोकअदालतीत उल्हासनगरमधून ६१२ प्रकरणे फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: १३ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ६१२ वाहतूक प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यातून शासनाच्या तिजोरीत चार लाख ४,४०० रुपये दंड स्वरूपात जमा करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीत उल्हासनगर वाहतूक विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, पोलीस हवालदार मोगरे, नाना आव्हाड, भारत खांडेकर तसेच वाहतूक वॉर्डन राहुल ससाणे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे प्रलंबित वाहतूक प्रकरणांचा जलद निपटारा होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असून, कायद्याविषयी जनजागृतीही वाढली आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाच्या या कार्याची वरिष्ठांकडून प्रशंसा करण्यात येत असून, भविष्यातही अशाच प्रभावी मोहिमा राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475