जिल्हा

ठामपाच्या तिजोरीत तीन दिवसांत सहा कोटी जमा

ठामपाच्या तिजोरीत तीन दिवसांत सहा कोटी जमा
ठामपाच्या तिजोरीत तीन दिवसांत सहा कोटी जमा फोटो: ठाणे वैभव
मालमत्ता कराची बोहनी झाली! आनंद कांबळे/ठाणे : मालमत्ता कराची मागील आर्थिक वर्षात विक्रमी वसुली केल्यानंतर नवीन आर्थिक वर्षात पहिल्या अवघ्या तीन दिवसांत ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सहा कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. प्रामाणिक ठाणेकरांचे महापालिका प्रशासनाने आभार मानले आहेत. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून मार्च २०२३ अखेर ७२० कोटींचा कर जमा झाला होता. नवीन २०२३-२४ आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे पाच लाख ६५ हजार ग्राहक आहेत. त्यापैकी सुमारे साडेतीन लाख देयके मालमत्ता ग्राहकांना ऑनलाइन तसेच एसएमएसद्वारे 31मार्चच्या मध्यरात्री पाठविण्यात आली होती. पहिल्या सहा महिन्यांत मालमत्ता कर भरला तर सामान्य करावर १०टक्के सूट मिळते. तो लाभ घेण्यासाठी अनेक ग्राहक त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करतात. १ एप्रिल रोजी एक कोटी ९३ लाख, २ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी तीन कोटी आणि आज ३ एप्रिल रोजी एक कोटी असा ऑनलाईन भरणा केला आहे. यावर्षी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मालमत्ता कर विभागाला आठशे कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षी उद्दिष्टापेक्षा १५ कोटींचे उत्पन्न जास्त वसूल करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. याबाबत कर निर्धारक आणि संकलक जी. जी. गोदापुरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कराची देयके वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांच्या माहितीसाठी पाठवली. ऑनलाइन घरी बसून करभरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळेच मागील वर्षी आणि चालू वर्षी करभरणा झाला आहे. यावर्षी देखील चांगली वसुली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475