जिल्हा

बुद्धिबळात पंचमने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन

बुद्धिबळात पंचमने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन
बुद्धिबळात पंचमने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन फोटो: ठाणे वैभव
कसारा: येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये वास्तव्यास असलेला 13 वर्षीय पंचम पंडित हा इयत्ता सातवीचा विद्यार्थी असून त्याने बुद्धिबळमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविले आहे. मागच्या वर्षी त्याने नाशिक जिल्ह्यातही बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवले होते. गेल्या वर्षभरापासून ग्लोबल चेस अकॅडमी कसारा येथे तो बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहे. पंचमला बुद्धिबळमध्ये 'रॅपिड' प्रकारामध्ये हे मानांकन मिळाले आहे. इतक्या कमी वयात बुद्धिबळ क्रीडा प्रकारात मानांकन मिळाल्याने पंचमच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्लोबल चेस अकॅडमीचे विनोद साळवे यांच्या मार्गदर्शनामुळे पंचमला हे यश मिळवता आले, असे पंचमच्या वडिलांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475