जिल्हा

ठाण्यात ५५० मि.मी. ज्यादा पाऊस

ठाण्यात ५५० मि.मी. ज्यादा पाऊस
ठाण्यात ५५० मि.मी. ज्यादा पाऊस फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मागिल आठवडाभर पडणाऱ्या पावसाने ठाण्यात हाहाकार उडवला आहे. आज एका घरावर झाड पडले, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही तर संध्याकाळपर्यंत १३ झाडे उन्मळून पडली. मागिल वर्षापेक्षा यंदा आत्तापर्यंत ५५० मि.मी. पाऊस जास्त पडला आहे. ठाणे शहरात जोरदार पाऊस बरसत असून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ८८.६३ मि.मी. इतका पाऊस झाला होता. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत २६.२८ मि.मी. पाऊस पडला. यावर्षी आतापर्यंत १८२१.१४ मि.मी. पाऊस पडला असून मागिल वर्षी या काळात १२७०.४८ मि.मी. पाऊस झाला होता. वेध शाळेने उद्या ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज देखिल व्यक्त करण्यात आला आहे. घोडबंदर मार्गांवरील एम के प्लाझाजवळील दोन घरांवर सकाळी १० वाजता झाड पडले होते. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, परंतु घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे शहरात १३ झाडे उन्मळून पडली होती. ही झाडे हटविण्याचे काम महापालिकेमार्फत सुरु होते. झाडे पडल्याने काही चारचाकी वाहनांचे देखिल नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475