जिल्हा

बाळकुममध्ये ५०००चौ.मी. जागेत उभे राहणार विज्ञान केंद्र

बाळकुममध्ये ५०००चौ.मी. जागेत उभे राहणार विज्ञान केंद्र
बाळकुममध्ये ५०००चौ.मी. जागेत उभे राहणार विज्ञान केंद्र फोटो: ठाणे वैभव
कामास युद्धपातळीवर सुरूवात करणार-आयुक्त ठाणे: ठाण्यामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुम विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे. यामध्ये पाच हजार चौ. मी जागेत प्रत्यक्ष प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासाठी आयुक्तांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांची भेट नुकतीच भेट घेतली. या कामास युद्धपातळीवर सुरुवात करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेणे व याबाबतचा आराखडा व अनुषंगिक बाबींबाबतची चर्चा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच बैठक घेतली. या चर्चेदरम्यान ठाणे शहरातील नियोजित जागेवर विज्ञान केंद्र उभारण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करुन युद्धपातळीवर कामास सुरूवात केली जाईल, असा विश्वास यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाच्या विविध भागात प्रादेशिक विज्ञान केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. याचा लाभ निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीसाठी डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना आयुक्त श्री. बांगर यांना केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. या बैठकीस मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे प्रा. ना. द मांडगे हे देखील उपस्थित होते. ठाण्यामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुम विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे. यामध्ये पाच हजार चौ. मी जागेत प्रत्यक्ष प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद यांचे मार्गदर्शन घेण्याची सूचना डॉ. अनिल काकोडकर यांनी बैठकीत केली. तसेच यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालबद्ध पध्दतीने सदर प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. या विज्ञान केंद्रात मुलभूत विज्ञान, भारतीय विज्ञान, कृषी जैविक शास्त्र, अवकाश विज्ञान, उर्जा आणि पर्यावरण, माहिती विज्ञान, विज्ञान शोधिका, तारामंडळ, विज्ञानवाटिका अशा सुविधा तसेच गोलाकार त्रिमिती चित्रपट संकुल, चित्रपट गृहसंकुल, नाविन्यपूर्ण हब, नोबेल म्युझिअम, कॉन्फरन्स सुविधा, शैक्षणिक इमारत, होस्टेल इमारत व फिरते विज्ञान प्रदर्शन आदी सुविधा असाव्यात असे डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी नमूद केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475